28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरविशेषमुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात

दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार

Google News Follow

Related

मुंबईकरांना आता काही दिवस जपून पाणी वापरावे लागणार आहे. ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस १५ % पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे येथे सुरू असलेल्या कूपनलिकेच्या खोदकामामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार ३१ मार्चपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणी कपात होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी देखील ही कपात लागू राहील. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे नुकसान पोहचल्याचे आढळून आले आहे. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे पाणी गळती दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काही अत्‍यावश्‍यक बदल करण्यात येणार आहेत.

वहन व्‍यवस्‍थेत बदल सुरु असताना व जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणे अटळ आहे. पर्यायी व्‍यवस्‍थेला देखील काही तांत्रिक कारणास्‍तव पूर्ण क्षमतेने वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही.

ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्‍त पाणीपुरवठ्यात ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात करण्‍यात येणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे. पाणी कपातीच्या काळात कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी करावा असे आवाहन मुंबईत महापालिकेने केले आहे.

हे ही वाचा:

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

जलबोगदा १५ किलोमीटर लांबीचा
मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५,५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा