मुंबई ते पणजी १२४५ रुपयांत

एसटी प्रवाशांसाठी खुशखबर

मुंबई ते पणजी १२४५ रुपयांत

नववर्षाला जेमतेम आठवडा शिल्लक राहिला आहे. या नवं वर्षाखेरीज शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी घराबाहेर नवं वर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत. शिवाय यात कोकणासह गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षावधी असते. अशातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मुंबई ते पणजी अशी वातानुकूलित (एसी) शिवशाही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्ह प्रवाशांकडून वर्तवली जात आहेत.

मुंबई सेंट्रल ते पणजी असा या वातानुकूलित शिवशाही बसचे एकूण भाडे हे १ हजार २४५ रुपये आहे. इतक्या कमी पैशांत पणजी गाठता येणार असुन सोबत गारेगार प्रवाशांची मज्जा सुद्धा लुटता येणार आहे. ही बस सेवा शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर पासून चालू होणार आहे.  मुंबई सेंट्रलहून दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी शिवशाही बस सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पणजी या ठिकाणी पोहोचणार आहे. तर या शिवशाही बसला पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी बसथांबे आहेत.

हे ही वाचा:

…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले

ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात

अपमान करून घेण्याची हौस…

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

नाताळच्या सणामध्ये पुढील आठवड्यात खासगी बसेसचे भाडे दीड ते अडीज हजारांपर्यंत जाण्याची शक्यत असते. एसटी महामंडळाने दखल घेत मुंबई-गोवा महामार्गावर मुंबई सेंट्रल ते पणजी अशी वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर गोवा राज्य परिवहन महामंडळाची ‘कदंब’ ही सेवा सुरू असून, या बसेचे प्रतिभाडे १ हजार २५० रुपये इतके आहे. अशा परिस्थितित एसटी महामंडळाने प्रवाशांना आरामदायी सेवा उपलब्ध व्हावा यासाठी शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या बसचे आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी या मोबाइल ऍपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

Exit mobile version