महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे लोकल अद्यापही बंद आहे. अशात मुंबईकरांना प्रवासाची मोठी चिंता आहे. पण या दरम्यान, मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई ते नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी आता वाहतुकीचं नवीन साधन सुरू करण्यात आलं आहे.
येत्या काही महिन्यात मुंबईहून जलवाहतूक सुरू होणार आहे. यंदा हा जलमार्ग बेलापूरमधील प्रिंसेस डॉकपासून मुंबईपर्यंत सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते चार महिन्यांत मेरीटाइम इंडिया समिट पार पडणार आहे. ज्यामध्ये भारत आणि परदेशातील अनेक कंपन्या भाग घेत आहेत. कोरोनामुळे, यावेळी ती व्हर्च्युअल समिट होणार आहे.
हे ही वाचा:
मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरांना जोडणार्या जलवाहतूक प्रकल्पासंदर्भात राजीव जलोटा म्हणाले की, “या प्रकल्पाची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली असून काही किरकोळ कामं शिल्लक आहेत. तीही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. काही महिन्यांत मुंबई ते नवी मुंबई शहर जलमार्गाने जोडलं जाईल.
मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर हा पहिला जलमार्ग सुरू करणार आहे.” वाशी, नेरूळ, ऐरोली आणि ठाण्यातील गोड माकड इथं थांबा देण्यात येणार आहे. मुंबई-बेलापूर जलमार्गाला एका तासामध्ये मुंबईहून नवी मुंबई पोहोचता येणार आहे. रोरो आणि रोपेक्स नवी मुंबईप्रमाणेच येत्या १ वर्षात मुंबईपासून काशिद, रेवस, कारंजा आणि जेएनपीटीपर्यंत जलमार्ग सुरू केले जातील.