पुन्हा एकदा मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी !

मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, अन्यथा मंत्रालय बॉम्बने उडवू

पुन्हा एकदा मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी !

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली.१५ दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा फोन आला आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बने उडून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात धमकीचा कॉल करणारा व्यक्ती हा मूळचा अहमदनगरचा आहे.अद्याप त्याची संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.मंत्रालय उडवून देण्याचा धमकीचा कॉल हा १५ दिवसांत दुसऱ्यांदा आला आहे.अचानकपणे मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.कॉल आल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली आहे. खबरदारी म्हणून मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड (Dog Squad) देखील दाखल होऊन मंत्रालयातील कानाकोपरा तपासत सर्व जागांची तपासणी करत आहेत.
फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे.त्याने फोनद्वारे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली.या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत संवाद साधायचा आहे.मात्र, मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्याने त्रस्त होऊन ही धमकी दिली अशी माहिती मिळाली आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा:

‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात

जोहान्सबर्गमधील इमारतीत अग्नितांडव; ६३ जणांचा मृत्यू

८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!

आजून एक घटना आज मंत्रालयात घडली. प्रशासकीय इमारतीमध्ये चाकू घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी पोलिसांकडून तपासणी केली जाते. तसेच सोबत घेऊन जाणाऱ्या वस्तू, बॅग्स यांची स्कॅनरद्वारे तपासणी केली जाते.एका व्यक्तीच्या बॅगेत चाकू असल्याचे स्कॅनरमध्ये आढळून आले.पोलिसांनी सावधगिरी बाळगत त्या व्यक्तीला अटक केली आहे.हा तरुण उमरगा येथून आल्याची माहिती मिळाली आहे.बॅगेत चाकू घेऊन येण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version