31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेष"पूर्वी इच्छा असूनही मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहता आले नाही"

“पूर्वी इच्छा असूनही मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहता आले नाही”

Google News Follow

Related

इच्छा असूनही मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहता आले नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दादरच्या शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दीपावलीच्या निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दीपोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होतं. राज ठकरे यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांपासून दीपोत्सव साजरा होत आहे. पण, आमची इच्छा असूनही आम्हाला इकडे येता येत नव्हते. काही गोष्टींसाठी नक्कीच योगायोग यावा लागतो असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमासठी हे तिनही दिग्गज प्रथमच एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाचा विषय ठरला आहे.

‘सर्वांना दिवाळीच्या मनापासून सुभेच्छा असे म्हणत मुख्यमंत्री म्हणाले की ,गेली दोन वर्षे हा उत्सव कोविडमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व सण जोरात साजरा करू असे वचन दिले होते. त्यानुसार आम्ही आमचं शब्द पाळला आहे. सर्व सण- उत्सवांवरील निर्बंध हटवले गणपती , नवरात्र असे सर्व सण जोरात साजरे झाले. आता दिवाळीही जोरात साजरी होईल. आतापर्यंत सर्वजण दाबून बसले होते पण आता मोकळा श्वास घेता येत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे.

शेतकऱ्यांना आधार देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याप्रमाणे निकषात बसत नसतानाही शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले. बळीराजाला कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही असेही शिंदे म्हणाले. हे सामान्यांचे सरकार आहे. प्रत्येक माणसाचे हे सरकार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

मनसेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. याबाबत आनंद आहे. या उपक्रमाला आणि राज्यातील सर्व जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी आपल्या आयुष्यात लक्ष लक्ष दिव्यांप्रमाणे प्रकाश घेऊन यावे. लक्ष लक्ष दिव्यांप्रमाणे आपले जीवन उजळावे या सदिच्छा अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा