29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषअबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!

अबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!

स्वीगीच्या वार्षिक अहवालात माहिती उघड

Google News Follow

Related

२०२३ हे वर्ष संपणार आहे.दरम्यान, ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप स्वीगीने त्यांच्या व्यवसायाचे ऑडिट आणि मूल्यांकन केले आहे.मुंबईतील एका व्यक्तीने एका वर्षात ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्याचे त्यांच्या खात्यामध्ये समोर आले आहे.१४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालात भारताच्या खाद्यपदार्थांमध्ये स्वीगी ॲपद्वारे ऑर्डर केलेली बिर्याणी ही देशातील सर्वात आवडती डिश असल्याचे अहवालात म्हटले आहे.

स्वीगीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, मुंबईतील एका वापरकर्त्याने एका वर्षात ४२.३ लाख रुपयांचे अन्न ऑर्डर केले आहे.अहवालात म्हटले आहे की, ऑनलाईन सर्वाधिक मागणी असलेल्या डिशेसमध्ये केक, गुलाब जामून,पिझ्झा यांसारख्या विविध पदार्थ आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे परंतु बिर्याणी या सर्वांमध्ये आघाडीवर आहे.भारतीयांना बिर्याणी आवडते.त्याचे वैशिष्ट्य या अहवालात दिसून येते.स्विगीच्या चार्टमधे बिर्याणी सातत्याने अव्वल आहे.यासाठी २०२३ हे वर्षही अपवाद न्हवते, कारण बिर्याणीने सलग आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.

हे ही वाचा:

संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण

धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींचे लाभ नको ! विधान परिषदेत मागणी

जरांगेंनी प्रश्नच मिटवला…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार

हैद्राबादची प्रसिद्ध डिश बिर्याणी देशभरातील खाद्य प्रेमींसाठी आवश्यक ठरली आहे आणि वर्षभरात बिर्याणीच्या एकूण १,६३३ ऑर्डर दिल्या जात आहेत.दररोज चारपेक्षा जास्त प्लेट्सचा हा आकडा आहे.मात्र, चिकन बिर्याणी हा लोकांचा आवडता पदार्थ आहे.

वृत्तानुसार, शाकाहारी लोकांनी ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीच्या प्रत्येक ५.५ प्लेट्समध्ये एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे.अहवालात म्हटले आहे की, हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान बिर्याणीची क्रेझ शिगेला पोहोचली होती, जेव्हा चंदीगढमधील एका कुटुंबाने एकाच वेळी ७० प्लेट्सची ऑर्डर दिली होती.स्वीगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, झाशीच्या एका रहिवाशाने एकाच दिवसात २६९ वस्तूंची ऑर्डर दिली होती, ज्याने एकच खळबळ उडवून दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा