दिलासादायक! गेल्या २४ तासांत मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद नाही

दिलासादायक! गेल्या २४ तासांत मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद नाही

मायानगरी मुंबईतून साऱ्या देशासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाच्या कारणास्तव एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईतून एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच २६ मार्च २०२० पासून असे पहिल्यांदाच घडले आहे. भारताच्या कोविड विरोधी लढाईच्या दृष्टीने ही खूपच सकारात्मक बाब मानली जात आहे.

भारतात सुरुवातीपासूनच कोरोना विरोधातील लढाई जोरदार सुरू होती. भारत या लढ्यात नवनवीन विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सध्या भारतात सुरू असून लवकरच भारत शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणार आहेत. अशातच या विक्रमाच्या उंबरठ्यावर असताना देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतून रविवार १७ ऑक्टोबर रोजी सकारात्मक बातमी आली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एकाही कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोविड विरोधी लढ्यातील भारताच्या प्रयत्नांना आलेले हे महत्त्वाचे यश म्हणावे लागेल.

हे ही वाचा:

केरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

गेल्या चोवीस तासात देशभरात १४१२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४४ कोरोना मुळे झालेले मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पण या मृत्यूच्या ठिकाणांमध्ये मुंबई शहराचा समावेश नाही. समस्त मुंबईकरांसाठी ही फारच दिलासादायक बाब मानली जात आहे.

Exit mobile version