28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषलसीकरण मोहिमेत मुंबईला '१०० टक्के' गुण!

लसीकरण मोहिमेत मुंबईला ‘१०० टक्के’ गुण!

Google News Follow

Related

मुंबईने लसीकरणात आज ऐतिहासिक टप्पा गाठत १८ वर्षांवरी वयोगटातील १०० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा राज्य सरकारने केंद्रावर निशाणा साधत केंद्राकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याचा आवाज केला होता. दरम्यान महाराष्ट्राने अनेक विक्रमांना लसीकरणामध्ये गवसणी घातली आहे. मात्र, त्याचे श्रेय केंद्राला दिलेले नाही.

मुंबईत आतापर्यंत ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

हे ही वाचा:

…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

दुसरीकडे ६५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पुढील काही दिवसात मुंबईतील ७० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असतील. त्यानंतर टास्क फोर्स नुसार मुंबई सेफ झोनमध्ये जाईल.

मुंबईसह देशभरात १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली होती. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू झाले. शहराने हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर पात्र नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा यासाठी आता प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा आणि जनजागृती करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा