मुंबई-पुणे द्रुतगती अपघात मार्ग?

मुंबई-पुणे द्रुतगती अपघात मार्ग?

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा सध्याच्या घडीला अपघातांचा सापळा बनलेला आहे. गतवर्षी २०२० मध्ये वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तब्बल ३० प्राणघातक अपघात झालेले आहेत. शिवाय वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेही अनेकांना हकनाक जीव गमवावा लागला आहे.

सध्याच्या घडीला म्हणूनच अपघात सत्रांसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग चांगलाच चर्चेत आलेला आहे. आसनपट्टा न लावल्यानेही अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. असे आता सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या अहवालामधून स्पष्ट झालेले आहे. गरज नसताना वाहनांची गती वाढवण्यामुळेही अपघात वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त वळण असलेल्या रस्त्यांवरही अपघात वाढलेले आता स्पष्ट झाले आहे.

वाहतुकीचे काही नियम हे चालकांना लागू पडतात. आजही अनेक चालक सीटबेल्ट न लावता गाडी चालवत असल्यामुळे भीषण अपघातांना सामोरे जावे लागत आहे. तसेच गतवर्षामध्ये वेगाने वाहन हाकल्यामुळेही अपघात झालेले आहेत. मार्गिका बदलणे या कारणावरुनही अपघात संभवतात, तरीही चालक दुर्लक्ष करतात.

हे ही वाचा:

दुसऱ्या कारागृहात हलविण्यासाठी अधिकाऱ्याने मागितले होते १० लाख

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’

कचाट्यात सापडलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका

चालकांकडून सर्रास होणारे नियमांचे उल्लंघन हे अपघातासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. यामुळेच जवळपास २५ भीषण अपघातही झाले आहेत. तसेच दोन वाहनांच्या टक्करीमध्ये अपघात घडलेल्या घटनांची नोंद आहे. दोन ट्रकचे अपघात, पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक आणि कार आणि ट्रकच्या अपघातात २९ जणांना जीव गमवावा लागला आहे. यासह अन्य विविध कारणांनी अपघात होऊन अनेकांनी द्रुतगती मार्गावर प्राण गमावले आहेत. चालकांनी मुलभूत नियमांचे नीट पालन केल्यास अपघातांची ही मालिका नक्कीच कमी होऊ शकते. चालकांकडून नियमांचे नीट पालन न झाल्यामुळे हे बहुसंख्य अपघात झाल्याचे चित्र आता सुस्पष्ट आहे.

Exit mobile version