मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिस्त मोडताय? मग तुम्हाला कुणीतरी पाहतंय

१ डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहीम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिस्त मोडताय? मग तुम्हाला कुणीतरी पाहतंय

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि बेशिस्तीतून अपघात हे जणू गणितच. या बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा आणि शिस्त लागावी, या उद्देशाने १ डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत १६८ अपघातात ६८ जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. या अपघातात घट व्हावे याउद्देशाने तब्बल सहा महिने द्रुतगती मार्गावर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महामार्ग पोलिसांची आता २४ तास करडी नजर असणार आहे. यासाठी पथकही नेमण्यात आले आहे.

अपघातांना आळा बसावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या गेल्या. त्यानंतरही या मार्गावरचे अपघात कमी होण्याची चिन्हे नाहीत. द्रुतगती मार्ग वळणदार आणि चढत्या-उतरत्या स्वरूपाचा आहे. या मार्गावर अवजड वाहनांचे चालक नियम पाळत नाहीत. बेदरकार लेन कटींग करतात आणि चुकीच्या लेन कटिंगमुळे अपघात होतात. इतरही वाहतूक नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

हेही वाचा :

श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे

महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा महिन्यांत एकूण अपघाताच्या फक्त एक टक्का घट दाखवण्यात आली आहे. जीवघेणे अपघात सात टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान एकूण १६९ अपघात झाले होते. त्यापैकी ६० जीवघेण्या अपघातांमध्ये ७४ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्याशिवाय ४४ गंभीर अपघातांमध्ये ९६ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत १६८ एकूण अपघात झाले असून त्यात ६८ जणांचा बळी गेला आहे. ४२ गंभीर अपघातांमध्ये ९२ प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याचे महामार्ग पोलिसांची आकडेवारी सांगते.

या अपघातांना आळा बसावा आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी, यासाठी महामार्गावरील एका तपासणी पथकात किमान दोन मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहेत. प्रत्येक तपासणी अधिकाऱ्यांनी रोज सकाळी दहा वाजता गेल्या २४ तासांत त्यांच्या पथकांनी केलेल्या कारवाईचा तपशील सादर करावा लागणार आहे.

दर सोमवारी सकाळी दहा वाजता आठवड्याचा अहवाल परिवहन आयुक्तांना द्यावा लागणार आहे. तपासणीदरम्यान इंटरसेप्टर वाहनांवर पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करून त्याद्वारे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधी वारंवार उद्‍घोषणासुद्धा केल्या जाणार आहेत. तपासणी मोहिमेवर देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर देण्यात आली आहे.

अशी असेल सज्जता

 

Exit mobile version