26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआपल्या दीड दिवसाच्या बाळाची विक्री करणारी महिला ताब्यात

आपल्या दीड दिवसाच्या बाळाची विक्री करणारी महिला ताब्यात

अवघ्या दीड दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे

Google News Follow

Related

अवघ्या दीड दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. ही महिला या बाळाची आई होती आणि तिला अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे मूल नको असल्यामुळे तिने त्याला विकण्याचे ठरवले पण पोलिसांनी ही योजना उदध्वस्त केली.

एका विशिष्ट गुप्त माहितीवर कारवाई करत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गोवंडी येथे सापळ्याची रचला केली गेली. योजनेनुसार ज्योतीने आपले बाळाला विकण्यासाठी एका दलालाला बोलावले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले, “एका महिलेच्या माहिती आधारे, आम्ही डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. आणि ते बाळ बेकायदेशीर असल्यामुळे ती त्या बाळाला विकार होती. योजना पार पाडल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता, मात्र तिच्या पतीला २०२० मध्ये एका गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती प्रियकरसोबत होती. “आमचे अधिकारी गुन्हा नोंदवून तिला अटक करण्याच्या प्रक्रियेत असल्याने काहीही सांगणे खूप घाईचे आहे. असे दिसते की तिचे अवैध संबंध लपवण्यासाठी तिने आपले बाळ विकण्याचा प्रयत्न केला असावा. ती उडवाउडवीची उत्तरे देत आहे, पण तिला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही तिची कसून चौकशी करू,” संग्रामसिंह निशानदार, डीसीपी म्हणाले. प्रेसमध्ये जात असताना अधिकारी आयपीसी कलम ३७० अंतर्गत मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवत होते.अशाप्रकारे ज्योती मुगाम ह्यांच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश मुंबई पोलिसानी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा