सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!

सायबर पोलिसांकडून शोध सुरु

सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!

मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या एका मुलाखतीतील व्हिडीओ सुपर इम्पोज करून आर्थिक फायद्यासाठी एका गेमिंग अप्लिकेशन साठी जाहिरात म्हणून वापरण्यात आला आहे. सेलब्रेटीचे अशा प्रकारे व्हिडीओ बेकायदेशीरपणे सुपर इम्पोज करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकारामुळे सेलिब्रेटीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सचिनचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी मंगळवारी पश्चिम विभागीय सायबर पोलिसांकडे या व्हिडिओची तक्रार केली.

हूर्मा नावाच्या युजरने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्यावर तो समोर आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तेंडुलकर यांनी पत्रकार विक्रम साठ्ये यांना दिलेल्या जुन्या मुलाखतीतील हे दृश्ये आहेत. ऑडिओला खरा आवाज देण्यासाठी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओवर सुपरइम्पोज केले गेले असे दिसून येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या जाहिरातीत दावा केला होता की साराने (सचिनची मुलगी) अँपवर गेम खेळून १.८ लाख जिंकले.

पारधे यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गेमिंग अँपच्या मालकावर तसेच व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (बदनामी) आणि कलम ६६(ए) (संवाद सेवेद्वारे आक्षेपार्ह संदेश पाठवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी हा व्हिडिओ ‘ एक्स’ (जुने ट्विटर) वर शेअर करत म्हटले आहे की, “हे व्हिडिओ बनावट आहेत. तंत्रज्ञानाचा सर्रासपणे होणारा गैरवापर अस्वस्थ करणारे आहे. सर्वांनी यासारख्या मोठ्या संख्येने व्हिडिओ, जाहिराती आणि अॅप्सची तक्रार करावी ही विनंती.

हे ही वाचा:

ट्रेनमध्ये तिकीट परीक्षकाकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित!

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल!

भारत जोडो न्याय यात्रेचं अखिलेश यादवांना आमंत्रण नाही; स्वतःची पदयात्रा सुरू करणार

आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सतर्क आणि तक्रारींना प्रतिसाद देण्याची गरज आहे. चुकीची माहिती आणि डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित कारवाई करणे महत्त्वपूर्ण आहे.” असे सचिनने म्हटले आहे.पश्चिम विभागातील सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ते फेसबुक वापरकर्त्याचा आयपी पत्ता शोधत आहेत ज्याने हा बनावट व्हिडिओ शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या छायाचित्राचा आणि व्हिडीओचा वापर करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात, सायबर पोलिसांनी एका अज्ञात आरोपीवर मास्टर ब्लास्टरच्या छायाचित्रणाचा वापर करून त्याच्या परवानगीशिवाय फॅट-बर्निंग स्प्रेची जाहिरात केली होती.

Exit mobile version