मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या नेत्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि शशांक नागवेकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ना.म जोशी मार्ग पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
खाजगी क्रीडा वाहिनी आणि मनोरंजन वाहिन्यांना मराठीमध्ये समालोचन करण्याची मागणी मनसे चित्रपट सेनेच्या नेत्यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसे चित्रपट सेनेने दिले होते. या आंदोलनाच्या पार्श्ववभूमीवर पोलिसांनी या नेत्यांना नोटीस बजावली आहे.
हे ही वाचा:
रामलीला सुरू असताना शंकराच्या भूमिकेतील कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू
… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
खो खो सामन्यांचे समालोचन मराठी भाषेतही करावे ही मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या नेत्यांची मागणी केली होती. हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सामन्यांचे समालोचन केले मग मराठी भाषेत का नाही ? असा सवाल मनसे नेत्यांनी उपस्थित केला आहे. आपली मागणी मान्य करण्यासठी वाहिन्यांना मनसे नेत्यांनी दिला आहे ४८ तासांचा अल्टोमेंटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनासंबंधी ना.म जोशी पोलिसांनी नोटीस दिली आहे. आंदोलनादरम्यान कायदा सुव्यसवस्थेची परिस्थिती निर्माण केल्यास कडक कारवाई करण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे.