कथित बँक घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांना क्लीन चिट दिली आहे. मोहित कंबोज यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते कंबोज यांची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यातूनही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर झाला होता. कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पांडे आणि कंबोज यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली होती. संजय पांडे यांच्या आर्थिक घोटाळ्यांना मोहित कंबोज यांनी थेट आव्हान दिले होते. त्यानंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा :
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत सुमारे ५२ कोटी रुपयांचे कर्ज फेडलेले नसल्याचा आरोप आहे. मोहित कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून हे कर्ज घेतले होते. हे कर्ज ज्या कामासाठी घेतले होते, त्या कामासाठी वापरण्याऐवजी ते इतरत्र वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज आणि कंपनीच्या अन्य दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. कंबोजला क्लीन चिट देताना या तपासात मोहित कंबोज यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे.