एका ख्रिश्चन शिक्षण मिशनच्या संचालकाने एका तंत्रशिक्षण संस्थेच्या संचालक- प्राचार्य पदावर असणाऱ्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ, मानसिक छळ तसेच त्याला व त्याच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृहे स्वच्छ करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित फादर विरोधात एमएचबी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवा एल्मा व्होकेशनल एज्युकेशनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक-प्राचार्य संतोष पांडुरंग शिंदे (४६) या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.बॉस्को बॉईज होमचे संचालक फादर कॉर्लिस नोएल गोन्साल्विस याच्या विरुद्ध एमएचबी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला असल्याचे, तक्रारदाराचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.संबंधित घटनेची अंमलबजावणी करून पोलिसांनी एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांचा वापर करून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
फादर गोन्साल्विस याने प्राचार्य शिंदेसह त्यांचे कर्मचारी आणि विद्यार्थी असे एकूण ८० जणांसोबत जातीयवादी अपमान, मानसिक छळ आणि वेगवेगळ्या स्वरूपात अपमानित केले आहे.प्राचार्य शिंदे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करून फादरला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा:
भारताचा कॅनडाला दणका; व्हिसा सेवा स्थगित
हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !
दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व
डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरच्या अकाऊंटवरून वडिलांचे निधन झाल्याचे ट्वीट
ख्रिश्चन शिक्षण मिशनचे संचालक फा. गोन्साल्विस हे सतत माझ्या विद्यार्थ्यांना आणि मला वेगवेगळ्या कारणांनी दोष देण्याचं काम करत असतात.यामध्ये आमचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित करणे, शौचालयांना कुलूप लावणे तसेच माझ्या सरकारी मान्यताप्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या विश्रांतीच्या खोल्यांची साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचार्यांना काढून टाकणे, असा आरोप प्राचार्य शिंदे यांनी केला आहे.तसेच वारंवार फा. गोन्साल्विस यांच्याविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
याची मूळ सुरुवात जानेवारी २०२३ मध्ये सुरु झाली, फादर गोन्साल्विस यांची गोराईजवळील बॉस्को बॉईज होममध्ये ३,६०० चौ. फूट इतकी जागा आहे.ही जागा आमच्याकडे भाडेतत्वावर आहे. ही जागा सहा महिन्यात रिकामी करावी अशी नोटीस फादर गोन्साल्विस यांनी आम्हाला पाठविल्याचे शिंदेनी सांगितले. ‘मी एक दलित जातीचा असल्याने गोन्साल्विस यांनी आमच्या संस्थेच्या शौचालयाला कुलूप लावून छळ सुरू केला असावा, असा संशय प्राचार्य शिंदे याना आहे.
“खरं तर, जानेवारी २०२२ मध्ये, फा. गोन्साल्विस यांनी काही धार्मिक सबबी वापरून मला मुख्य इमारतीतील ३,६०० फूट जागा रिकामी करण्यास सांगितले आणि बेकायदेशीरपणे कंपाऊंडमधील सुमारे २,५०० चौरस फुटांच्या जागेवर माझ्या संस्थेला लहान शेडमध्ये हलवण्यास भाग पाडले, शिंदे यांनी सांगितले. एफआयआरनुसार “तुम्ही खालच्या जातीच्या लोकांनी माझे शौचालय वापरले आहे आणि ते घाण केले आहे… तुम्ही आता हाताने शौचालय स्वच्छ करा”.असे फा. गोन्साल्विस यांनी म्हटल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सुविधेपासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांनी प्रताप पाटील आणि हिमांशू झा अशा दोन शिक्षकांकडे गोन्साल्विस यांची तक्रार केली. गोन्साल्विस याना हे कळताच ते चिडून म्हणाले, “यापुढे तुम्हाला शौचालये वापरायचे असतील, तर हाताने सर्व गाळ साफ करा आणि मला कळवा.”असे म्हणाले.त्यानुसार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्राचार्य शिंदे व त्यांचे काही शिष्य शौचालय वापरल्यानंतर स्वच्छ करतात आणि याची माहिती गोन्साल्विस याना ईमेलद्वारे कळवतात.
एफआयआरमध्ये नोंद केल्यानुसार, जेव्हा शिंदे पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी गोन्साल्विस यांच्याकडे करायचे तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही खालच्या जातीतील ‘चामर’, ‘भंगी’, ‘चोर’ आणि ‘आंबेडकर औलाद (वंशज)’ आहात त्यामुळे या पाण्याला स्पर्श करण्याचा किंवा पिण्याचा तुम्हाला अधिकार नाही, ज्या पाण्याने तुम्ही शौचालय स्वच्छ केले आहे, तेच पाणी तुम्हाला पिण्या योग्य आहे, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
प्राचार्य शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच अपरिहार्य परिस्थिती आणि इतर समस्यांमुळे ‘बेकायदेशीर शेड’मधून आम्ही आजून बाहेर पडलो नसून फादर गोन्साल्विस याच्या छळाला सामोरे जात आहोत.आम्ही फादरच्या अशा वृत्तीमुळे हैराण झालो असून , पोलिसांनी लवकरात लवकर फादर गोन्साल्विस याच्यावर कारवाई करावी अशी आमची इच्छा असल्याचे, शिंदे यांनी सांगितले.