केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नाशिकमध्ये १,६७८ कोटी रुपये आणि २०६ किमी पर्यंत विस्तारलेल्या बारा राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी केली. मुंबई-नाशिक महामार्गावर ५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणाही केली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर ५ हजार कोटी रुपये खर्च केले जातील. मुंबई ते नाशिक दरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होईल. हा प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण केला जाईल.” असं ते म्हणाले. सध्या १६६.२ किलोमीटरचा मुंबई-नाशिक भाग व्यापण्यासाठी सुमारे ३ तास ३५ मिनिटे लागतात.
“वाहनांच्या हॉर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरही लक्ष द्यायला हवे. वाहनांमधील हॉर्न कर्कश आवाज निर्माण करतात, जे अत्यंत जोरात वाजतात. त्यामुळे सरकारने त्या हॉर्नच्या जागी अधिक अनुकूल हॉर्न लावण्याची योजना आखली आहे.” असे सांगून ते म्हणाले की भविष्यात सर्व वाहने हॉर्नसाठी भारतीय वाद्यांच्या आवाजाचा वापर करू शकतात.” असंही गडकरी म्हणाले.
हे ही वाचा:
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’
“मंत्री यांनी रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या मोठ्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असे आश्वासन दिले की पायाभूत सुविधांचे नूतनीकरणदेखील प्रवास अधिक आरामदायक आणि कमी धोकादायक बनवण्याच्या उपाययोजनांवर आधारित आहे. रस्ते अपघातात मानवी जीवितहानी कमी करणे हे मुख्य लक्ष आहे.” असं ते म्हणाले.