गणेश मंडपात खड्डा असेल तर दोन हजारांचा दंड

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

गणेश मंडपात खड्डा असेल तर दोन हजारांचा दंड

गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी साऱ्यांची लगबग सुरू आहे. मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे आगमन आठवडाभर आधीच सुरू झालं आहे. कोरोना निर्बंधमूक्त वातावरणात यंदा गणेशोत्सव पहिल्यांदाच धुमधडाक्यात साजरा होत आहे. बाप्पाच्या उंचीवरील निर्बंधही हटवल्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटले असले तरी गणपती मंडळांना गणेशोत्सव मंडपाची उंची ३० फूटापर्यंतच ठेवावी लागणार आहे. इतकच नाही तर मंडप बांधणीचा अहवालही महापालिकेला सादर करणं बंधनकारक असेल. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना हे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. मात्र, आता कोरोना नियंत्रणात असल्याने हे निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणा-या साहित्यांनी बाजार सजले आहेत. आठवडाभर आधीच खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळलेली बघायला मिळत आहे.

पीओपी मूर्तीवर नाही पण मंडपाच्या उंचीवर निर्बंध

यंदा पीओपीच्या गणेशमुर्तीवर मर्यादेचे बंधन नसले तरी मंडपाच्या उंचीवर बंधन असणार आहे. मंडपाची उंची ३० फुटांपर्यंत असणार आहे प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे नियमावलीत म्हटलं आहे. मंडप परिसरात पालिकेनं तयार केलेल्या लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक प्रदर्शित करता येणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

प्रत्येक खड्यामागे २हजार रुपये दंड
बहुतांश गणेशोत्सवाचे मंडप हे रस्त्यावर टाकले जातात. हे टाकताना अनेकदा खड्डे पडतात. हे लक्षात घेऊन मंडप उभारताना रस्त्यावर खड्डा आढळल्यास प्रत्येक खड्ड्य़ामागे दोन हजार रुपयाचा दंड आकारला जाणार असल्याचं नियमावलीत स्पष्ट केलं आहे.

परिसराची स्वच्छता मंडळाची जबाबदारी

सध्या मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी असणार आहे. आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे. मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही याकडे पालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

वाहन व पादचाऱ्यांसाठी जागा राखीव

रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी पादचारी व वाहनधारकांची ये- जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल, याची काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

Exit mobile version