कुलाबा-वांद्रे-SEEPZ मार्गावरून जाणारी मुंबईची पहिली भूमिगत ‘मेट्रो लाइन-३’ चे काम या वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी भिडे बोलत होत्या.मेट्रो लाइन-३ प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी या प्रकल्पाचे महत्त्व अश्विनी भिडे यांनी या खास मुलाखतीत सांगितले.
एमएमआरसीच्या कामकाजाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रगतीबद्दल अश्विनी भिडे यांना प्रश्न विचारण्यात आला.तेव्हा त्या म्हणाल्या की, आरे ते बीकेसी पर्यंत बोगदा आणि नऊ मध्यवर्ती स्थानकांच्या बांधकामासह ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.आमचे लक्ष आता डेपो पूर्ण करण्यावर आहे, जे पहिल्या टप्प्यातील कामकाजासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.तथापि, डेपो आणि मुख्य लाईन यांच्यातील संपूर्ण कनेक्टिव्हिटीचे काम बाकी आहे, विशेषतः शंटिंग नेक एरियामधील काम अद्याप बाकी आहे. या भागाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये परवानगी दिली.त्यानंतर या परिसरातील झाडे काढणे आणि उत्खनन करणे अशा कामांमुळे विलंब झाला.मात्र, १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण कनेक्टिव्हिटी प्राप्त होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
तुम्ही ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपरेशन्सच्या संभाव्यतेबद्दल चर्चा केली आहे. याबाबत सध्याची योजना काय आहे? असा प्रश्न त्यांना विचारला.त्यावर अश्विनी भिडे म्हणाल्या की, या योजनेमध्ये मानवरहित ट्रेन ऑपरेशन्स (UTO) लागू करणे समाविष्ट आहे, मात्र त्यापूर्वी यामध्ये दोन मध्यवर्ती टप्पे आहेत.त्यातील एक म्हणजे स्वयंचलित ट्रेन संरक्षण आणि स्वयंचलित ट्रेन ऑपरेशन (ATO).सध्या, आमचे लक्ष्य स्वयंचलित ट्रेन ऑपरेशन (एटीओ) मोडमध्ये चालवणे असल्याचे त्यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, पूर्णपणे मानवरहित ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेले UTO प्रमाणीकरण भारतात अद्याप प्राप्त झालेले नाही या वस्तुस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रो लाईन-३ हा लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे?, असा प्रश्न विचारल्यास अश्विनी भिडे म्हणाल्या की, हा एकमेव कॉरिडॉर मार्ग आहे जो बेटाच्या शहरातून जाणारा आहे. वाहतुकीच्या विविध पद्धतींना एकमेकांशी जोडण्याचे काम हा मार्ग करणार आहे. विशेषत: मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या भागांतून आणि शेजारच्या भागांतून जाणारा हा मार्ग विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.त्या पुढे म्हणाल्या की, मेट्रो-३ प्रकल्प सुरु झाल्यानंतर सुरवातीला दररोज सुमारे ४.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होण्याची अपेक्षा आहे.मात्र, हे काम पूर्ण होईल तेव्हा या वाहनांची संख्या ६.५ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, हे सध्या करण्यासाठी ५-१० वर्ष तरी लागतील, कारण त्यासाठी प्रवाशांच्या वर्तनात लक्षणीय बदल होणे आवश्यक आहे, त्या पुढे म्हणाल्या.
मेट्रो लाइन-३ साठी तिकीट भाडे किती असेल?, असा प्रश्न अश्विनी भिडे यांना विचारण्यात आला.त्यावर त्या म्हणाल्या की, मेट्रो कायद्यानुसार सुरुवातीचे भाडे मेट्रो रेल्वे प्राधिकरणाद्वारे निर्धारित केले जाईल.मुंबईत सध्या जसे भाडे आकारले जात आहे त्यानुसारच हे भाडे असणार आहे.टप्पे आणि लांबीमधील( अंतर ) थोडा फार फरक असू शकतो. बोर्डाकडून मान्यता मिळाल्यानंतर हे भाडे लागू करण्यात येईल, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.