मेट्रो आरे कारशेड एप्रिल २०२३ पर्यंत सज्ज

मेट्रो आरे कारशेड एप्रिल २०२३ पर्यंत सज्ज

mumbai metro

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रो ३ च्या कामाला वेग आला आहे. कुलाबा, वांद्रे-सीप्झ या मेट्रो लाईन ३ साठी आरे येथे येत असलेल्या कारशेडचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर, मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३ कॉरिडॉरचा वांद्रे- सीप्झ पहिला असेल. दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणारी ३३.५ किमी लांबीची भूमिगत मेट्रो ३ दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड सीप्झ आणि बीकेसी दरम्यानच्या कॉरिडॉरचा टप्पा १ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आखत आहे.  मेट्रोचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. असं एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे.

प्रकल्प खर्चात वाढ

मुळात, मार्गावरील काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु कामास विलंब झाल्यामुळे अंतिम मुदत चुकली आणि प्रकल्पाची किंमत २३,१३६ कोटी रुपयांवरून ३३,४०५ कोटी रुपयांपर्यंत वाढली.

हे ही वाचा:

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या

डिसेंबरपर्यंत व्यावसायिक काम

एप्रिल २०२३ पर्यंत पहिल्या टप्प्यातील डेपोचे डेपोचे एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत व्यावसायिक कामकाजाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने जून २०२३ पर्यंत रेल्वे आयुक्तांच्या पाहणीसाठी सुरक्षाविषयक सर्व कामकाजाची डेडलाईन पूर्ण करण्यात येईल असे भिडे यांनी सांगितले .

मेट्रो-३ गाडीचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल

मुंबई मेट्रो लाइन ३ (एक्वा लाइन) च्या प्रोटोटाइप रेकचे बहुप्रतिक्षित डबे अलिकडेज मुंबईत दाखल झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते आणखी चार डबे लवकरच दाखल होतील. एमएमआरसीनुसार, सर्व आठ डबे एकत्र केले जातील. हे चार डबे प्रत्येकी ४२ टन वजनाचे आहेत.

Exit mobile version