अंधेरीत आग आणि धुराचे लोट; अग्निशमन दलाची शर्थ

अंधेरीत आग आणि धुराचे लोट; अग्निशमन दलाची शर्थ

आज चार वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडजवळील चित्रकूट मैदानावरील चित्रपटाच्या सेटला दुपारी ४.२८ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. फन रिपब्लिक थिएटरच्या पाठिमागे असलेल्या या सेटवर या भीषण आगीच्या मोठ्या ज्वाळा निघत होता. आकाशात सर्वत्र काळा धूर जमा झाला होता. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अंदाजे १००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या परिसरात आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ताज्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. परंतु यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

स्टुडिओच्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही घटना शुक्रवारी दुपारी ४.२८ वाजता घडली. स्थानिक रहिवाशांनी दुपारी सांगितले की, स्टुडिओतून प्रचंड धूर निघत होता. अग्निशमन दलालाही ३० मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही घटना घडली तेव्हा स्टुडिओमध्ये सुमारे ५० ते १०० कामगार होते.

 हे ही वाचा:

शॉर्ट सर्किटमुळे आग

आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी सांगितले की, “चित्रकूट स्टुडिओला दुपारी ४.२८ वाजता मोठी आग लागली. प्राथमिक तपासात आम्हाला असे आढळून आले की, मुख्य विद्युत मंडळात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही आग नंतर संपूर्ण स्टुडिओच्या परिसरात पसरली. स्टुडिओमधील सुमारे १,००० चौरस फूट परिसरात ही आग पसरली. पोलिस, वाहतूक पोलिस, बीएमसी वॉर्ड . पोलीस, वाहतूक पोलीस, बीएमसी वॉर्ड कर्मचारी, पाणी विभाग, अग्निशमन दल आणि वीज अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळविले.

Exit mobile version