साहिर लुधियानवी आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम!

साहिर लुधियानवी आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम!

मुंबईत महापलिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखा विक्रम रचला आहे. तब्बल ११८ गायकांनी स्वतंत्र गाणी सादर करत या विश्वविक्रमाला गवसणी घातली. शनिवार शीव रुग्णालयातील सभागृहात पार पडलेल्या संगीताच्या या कार्यक्रमात गीतकार साहिर या एकाच गीतकाराची गाणी गात केलेल्या या विक्रमाची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

सो गो ग्रुप हा मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेला करावके गायकांचा समूह आहे. या ग्रुपने ११ डिसेंबर २०२१ रोजी सायन मेडिकल कॉलेज, मुंबईच्या सभागृहात २५ वा गायन सोहळा आयोजित केला होता. आणि या गायनाची थीम गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली गीते होती.

गीतकार साहिर यांनी निसर्ग आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील तत्त्वज्ञानावरची गाणी लिहिली आहेत. त्यावर आधारित शैलेंद्र सोनटक्के, उत्तम गोवेकर आणि प्रीती पुजारा यांच्या नेतृत्वाखाली ११८ महापालिका कर्मचाऱ्यांनी साहिर लुधियानवी यांची गाणी सादर करून विश्वविक्रम केला.

हे ही वाचा:

मुक्त, स्वतंत्र, समृद्ध ‘स्मिता’

DRDOकडून सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी

भारतीय नौदल होणार आता आणखी ‘स्मार्ट’

स्मिता पाटील …. बोलका चेहरा आणि मुद्देसूद बोलणं

 

याप्रसंगी मुंबई महानगरातील सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यामध्ये ट्रॅक संकलनाचे, संपादनाचे तसेच कार्यक्रमाच्या चित्रणाचे काम स्टुडिओ ९९ चे पवन गोसावी यांनी केले तर ध्वनियोजना महाडिक साऊंडचे प्रथमेश यांनी केली होती. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डने याची दखल घेत आपल्या पुस्तकात या विश्वविक्रमाची नोंद घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी डॉ.अनिता गुप्ता, प्रा.सुशांत म्हैसूरकर, प्रा.सुजित पाल आणि ओएमजी रेकॉर्ड्सचे प्रा.डॉ.दिनेश गुप्ता उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली हे रेकॉर्ड केले गेले.

Exit mobile version