मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या कोलकात्याने हार्दिक पांड्याच्या मुंबईचा २४ धावांनी पराभव केला. या विजयामुळे कोलकात्याने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. तर, मुंबई स्पर्धेतून बाद होण्याची चिन्हे आहेत.
कोलकात्याने मुंबईला सन २०१२पासून पहिल्यांदाच मुंबईतच पराभवाची धूळ चारली. मुंबईने येथे कोलकात्याचा नऊवेळा पराभव केला आहे. तर, कोलकात्याला आतापर्यंत केवळ एकदाच मुंबईवर विजय मिळवता आला आहे. मुंबईने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नुवान थुशाराने चांगली सुरुवात करून दिली.
कोलकात्याची अवस्था तीन षटकांत तीन बाद २८ अशी झाली होती. नुवानने फिल सॉल्ट, अंगकृश रघुवंशी यांना बाद केले. सुनील नारायण आणि रिंकू सिंहदेखील झटपट बाद झाले. त्यामुळे कोलकात्याची अवस्था ६.१ षटकात सहा बाद ५७ झाली. कोलकात्याचा संघ १०० धावाही करू शकणार नाही, असे वाटत असातनाच व्यंकटेश अय्यर व मनीष पांडे मैदानात उतरले. पांडे याने दोन चौकार, दोन षटकारांसह ३१ चेंडूंत ४२ धावा केल्या. त्याने ३६चेंडूंतच अर्धशतक ठोकले. तर, सहा चौकार, तीन षटकारांसह ५२ चेंडूंत ७० धावा केल्या. पांडे आणि व्यंकटेश यांनी सहाव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली.
बुमराहने १८ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर, हार्दिक पांड्याने सुनील नारायण आणि पांडेची विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये ४६ धावा तडकावल्या. इशान किशन, रोहित शर्मा आणि नमन धीर या तीन फलंदाजांनी दोनआकडी धावा केल्या, मात्र ते खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. मिचेल स्टार्क, नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी त्यांचा बंदोबस्त केला.
हे ही वाचा:
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!
पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!
तिलक वर्मा, नेहल वधेरा आणि हार्दिक पांड्या यांनाही फार काही करता आले नाही आणि मुंबईची अवस्था ११.२ षटकांत सहा बाद ७१ अशी झाली. सूर्यकुमार यादव आणि टिम डेव्हिड यांनी थोडीफार लढत दिली. सूर्यकुमार यादवने चांगली खेळी केली. त्यामुळे मुंबईसमोर ३६ चेंडूंत ६० धावांचे लक्ष्य होते. त्याने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने सहा चौकार, दोन षटकारांसह ३५ चेंडूंत ५६ धावा केल्या. रसेलने सूर्याला बाद केले. तर, टिम डेव्हिडने स्टार्कची विकेट घेतली. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने पियुष चावलाची विकेट घेतली. त्यानंतर स्टार्कने गेराल्ड कोएट्झी याला बाद करून सामना संपवला. स्टार्कने ३.५ षटकांत ३३ धावा देऊन चार विकेट मटकावल्या.