शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मुंबई इंडियन्सची बाजी

शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मुंबई इंडियन्सची बाजी

वुमन्स प्रीमियर लीग २०२४ सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर पाच धावा असताना सजनाने षटकार खेचत दिल्लीच्या तोंडातील घास हिरावून घेतला.

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष ठेवले होते. अर्धशतकवीर हरमन प्रीतला शेवटच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बाद केल्यानंतर जवळ जवळ हा सामना दिल्लीच्या बाजूने झुकला होता. पण आपला पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या सजनाने उत्तुंग षटकार खेचत मुंबई इंडिन्सला हा सामना ४ विकेट्सने जिंकून दिला. या विजयसाह मुंबई इंडियन्सच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ टॉपला, तर दिल्ली कॅपिटल्सची घसरण शेवटच्या स्थानावर झाली आहे.

या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या एलिस कॅप्सेची ७५ धावांची खेळी वाया गेली. मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. हिली मॅथ्यूज शू्न्यावर बाद झाल्याने पहिल्या षटकापासून दडपण आले होते. त्यानंतर यास्तिका भाटिया आणि नॅट सायवर ब्रंट यांनी डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर यास्तिकाला हरमनप्रीत कौरने डाव सावरला. दोघांनी ५६ धावांची भागीदारी केली. यास्तिकाने ४५ चेंडूत ५७ धावा केल्या. मात्र अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर बाद झाली.

हेही वाचा :

मनोहर जोशी नावाचा ‘कोहिनूर’

आंदोलन हिसंक होणार नाही याची जबाबदारी मनोज जरांगे घेणार का?

भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!

छत्तीसगड: नक्षलवाद्यांकडून दोन महिलांची हत्या!

त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने चेंडू आणि धावा यातील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीतने ३४ चेंडूत ५५  धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत तिने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. दोन चेंडूत ५  धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु एलिस कॅप्सेच्या गोलंदाजीवर सुथरलँडने तिचा सीमेवर झेल टिपला. त्यामुळे एक चेंडू आणि पाच धावा अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सामना पूर्णपणे दिल्लीच्या पारड्यात झुकला होता. सजना समोर होती आणि कॅप्से गोलंदाजीला होती. शेवटच्या चेंडूवर सजनाने षटकार मारत सामना मुंबई इंडियन्सला जिंकून दिला.

 

Exit mobile version