24 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषहार्दिक कर्णधार झाला आणि मुंबई इंडियन्सने गमावले पाठीराखे

हार्दिक कर्णधार झाला आणि मुंबई इंडियन्सने गमावले पाठीराखे

पंड्याला कर्णधार करताच फ्रँचायझीचे ४००,००० फॉलोअर्स एक तासात कमी

Google News Follow

Related

आयपीएलमध्ये सलग दहा वर्षे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माला कर्णधार पदावरून पाय उतार झाला. त्याजागी इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या मोसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधारपदी हार्दिक पंड्याची नियुक्ती केली. यामुळे मुंबई इंडियन्सने ट्विटरवर चार लाख फॉलोअर्स गमावले आहेत. हार्दिकला १५ डिसेंबर रोजी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. परिणामी रोहितच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला अनफॉलो करत दणका दिलेला आहे.

 

रोहित २०१३ पासून मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळत होता. मुंबई इंडियन्सला त्याने विक्रमी पाच विजेतेपद जिंकून दिले आहेत. ज्याची बरोबरी आयपीएल २०२३ मध्ये महेंद्रसिंग धोनीने केली होती. २०२२ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताकडून टी-२० सामना न खेळलेला शर्मा आयपीएल २०२४ पासून आपल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार नाही. विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा :

मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, दीपक चहरची वनडेतून माघार

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती

लोअर परळ येथील सहकारी पतपेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध गुन्हा

‘सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकी पॉटिंगपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केलेले आहे. ज्यांनी तात्कालिक यशात योगदान देतानाच भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. याच तत्वज्ञानाला अनुसरून हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ हंगामासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारेल,’ असे मुंबई इंडियन्सचे महेला जयवर्धने यांनी सांगितले.

पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने ३ विकेट्स घेतल्या आणि ३४ धावा केल्या. तेव्हा पांड्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते. पांड्याने २०२३ मध्येही चांगली कामगिरी केली होती आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. परंतु त्यांना एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटच्या चेंडूच्या थरारक सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा