31 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरविशेषधबधबे, हिरवाई, नद्या, शेतीदर्शनासाठी अधिक प्रवासी तेजसला जोडणार

धबधबे, हिरवाई, नद्या, शेतीदर्शनासाठी अधिक प्रवासी तेजसला जोडणार

१४ एप्रिलपासून तेजसला प्रवास होणार आणखी सुखकर

Google News Follow

Related

मोठमोठ्या खिडक्या आणि पारदर्शक छप्पर असलेले व्हिस्टाडोम कोच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला आता १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.

मोठ्या खिडक्या आणि पारदर्शक छत असलेले हे डबे मुंबई ते पुणे आणि गोवा रेल्वे विभागातील प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. आता अतिरिक्त व्हिस्टाडोम कोच जोडल्यामुळे, असे दोन डबे असणारी ही देशातील पहिली ट्रेन ठरेल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.

मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.

हे ही वाचा:

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

व्ह्यूइंग गॅलरी प्रवाशांचे सर्वात मोठे आकर्षण

व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्‍यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा