मुंबई-गोवा तेजतर्रार प्रवासासाठी आणखी नऊ महिने प्रतिक्षा

मुंबई-गोवा तेजतर्रार प्रवासासाठी आणखी नऊ महिने प्रतिक्षा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीरकरणाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या रखडलेल्या सिमेंटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याची एक मार्गिका येत्या मेपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र मुंबई-गोवा वेगवान प्रवासासाठी आणखी किमान नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सोमवारी दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत अमित साटम, आदिती तटकरे, सुनील प्रभू, आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान चव्हाणांनी ही माहिती दिली. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० विभागांमध्ये सुरू आहे. त्यापैकी ५ विभागांमधील काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

हेही वाचा :

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

काही आमदार परत येतील म्हणूनच १६ आमदारांना नोटीस दिली

काय आहे लाईफ ऑफ ‘पाय’?

भूसंपादन, विविध विभागांच्या परवानग्या वेळेत न मिळाल्याने या महामार्गाचे काम रखडले होते. परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्यासाठी हा घाट किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. याआधी हा घाट बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत.

रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ किलोमीटर लांबीच्या एका मार्गिकेचे काम मे महिन्याच्या अखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच दुस-या लेनच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे व अन्य कामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

Exit mobile version