मुंबई अग्निशामक दलात सुनीता खोत आणि एस व्ही भोर या दोन महिला अधिकाऱ्यांची ‘सहाय्यक स्थानक’ अधिकारी म्हणून मुंबई अग्निशामक दलात कार्यरत होते. हे दोन्ही अधिकारी गेल्या १० वर्षांपासून अग्निशामक दलात कार्यरत असून, आता त्यांची ‘स्टेशन ऑफिसर’ म्हणून भायखळा आणि वडाळा येथे नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशामक अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले की, यावर्षी २३ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये स्टेशन अधिकाऱ्यांच्या भूमिकेसह प्रशासकीय भूमिका घेण्यापासून संपूर्ण अग्निशमन केंद्र चालवणे समाविष्ट आहे.
“स्टेशन ऑफिसरच्या कामात अग्निशमन केंद्र चालवणे, अग्निशमन कॉल अटेंड करणे, देखभालीची कामे करणे आणि इतर प्रशासकीय कामांचा समावेश असेल. अग्निशमन दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना या पदावर पदोन्नती करून देण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की महिला भविष्यात एक उंच स्थान स्थापित करतील,” असे परब म्हणाले.
वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की अग्निशमन दलात एकूण ११६ महिला अग्निशामक आहेत आणि मुंबई अग्निशमन दलाकडे भारतातील सर्वाधिक महिला अग्निशामक आहेत, “आता त्यांना बढती मिळाल्याने या दोन महिला अधिकाऱ्यांना २४ तास ७ ही दिवस सतर्क राहावे लागणार आहे. तसेच आपापल्या अग्निशमन केंद्राच्या हद्दीत इमारत कोसळणे, आग किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यांना मदत कार्याचे नेतृत्व करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
कुर्ल्याचे दोघे मिठी नदीत बुडाले
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
आमदार निघून गेले आता नगरसेवकांना साकडे
अग्निशामक दलात मैदानी चाचणीतील प्रक्रिया
१६२ सेमी उंची आणि ५० किलोग्रॅम वजनाच्या आवश्यकता पूर्ण करण्या व्यतिरिक्त, त्यांच्या फिटनेसचा भाग म्हणून, महिला अग्निशामकांनी चार मिनिटांत ८०० मीटर धावणे, तसेच १९ फूट उंचीवरून उडी मारणे व ४५ किलो वजनाचा डमी पाठीवर घेऊन धावणे आवश्यक आहे. लांब उडी, भालाफेक, गोळा फेक आणि शिडी चढणे अशी प्रक्रिया भरती दरम्यान पार पाडावी लागणार आहे.