मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.
बोरिवली पूर्वमधील मागाठाणे मेट्रो स्टेशन विरुद्ध असलेल्या २२ मजली रहिवासी कनाकिया समर्पण टॉवरमध्ये आज (२५ जुलै) दुपारी १२.३७ च्या आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी १ च्या सुमारास आग आटोक्यात आणली.
इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमधील विद्युत वायरिंग आणि केबल्समुळे ही आग आणखी भडकली आणि इमारतीच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत पसरली. आग आणि धुरामुळे गुदमरलेल्या चार जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर अन्य तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. महेंद्र शाह (७० ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तर रंजना राजपूत (५९), शिवानी राजपूत (२६) आणि शोभा सावळे (७०) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
विमानतळावर अधिकाऱ्याना मारहाण केल्याप्रकरणी मुस्लीम समुदायातील चौघांना अटक
ऑलिम्पिक २०२४; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश !
पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात
अनिल देशमुख पुरावे द्या, ३ तासाच्या आत तुमच्याही ऑडियो क्लिप्स जनतेसमोर आणू !