या रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

चार रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार

या रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

मुंबईत झपाट्याने वाढत जाणाऱ्या लोकसंख्या ही अपुऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानक गैरसोयीचे कारण बनत चालले आहे. त्यातच आता रेल्वे स्थानकांमध्ये वाढत जाणारी प्रवासीसंख्या ही सर्वात मोठे कारण आहे. तर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ अ’ अंतर्गत मिरारोड, कांदिवली, कसारा आणि नेरळ या चार रेल्वे स्थानकामध्ये दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार असून, हे रेल्वे स्थानक साधारण येत्या तीन वर्षात सर्व सुविधांसह सज्ज होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

तसेच या स्थानक सुधारण्यासाठी प्रवाशांच्या मागणी नुसार तिकीट खिडक्या, अन्य प्रवासी सुविधा, पूर्व-पश्चिमला जोडणारे पूल, सुनियोजित प्रवेशनिर्गम या सुविधांचा समावेश आहे. तर बोरिवली स्थानकाच्या आधारावर कांदिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. तर या स्थानकांच्या पश्चिम दिशेला १०.३ मीटर रुंदीचा प्रशस्त डेक उभारण्यात येणार आहे. तसेच सर्व पादचारी पूलांची याला जोडणी करण्यात येणार आहे.

मिरारोड स्थानकात ११ मीटर रुंदीचा डेक उभारण्यात येणार आहे असून सध्याचे तिकीटघर, आरक्षण कार्यालय, रेल्वे अधिकारी कार्यालय अन्यत्र हलवण्यात येणार आहे. तर या दोन स्थानकांसाठी १२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ‘एमयूटीपी ३ अ’ स्थानक सुधारणा प्रकल्पातील चार स्थानकांचे काम दिवाळीनंतर सुरू होणार असून , साधारण १८ महिन्यांमध्ये प्रवाशांना वापरण्यास उपलब्ध होतील. अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सुभाषचंद्र गुप्ता यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

इतर स्थानकामध्ये १० मीटर रुंदीच्या पूलाला स्कायवॉकची जोडणी देण्यात येईल. तसेच दोन्ही प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. ‘एमयूटीपी ३ अ’ या प्रकल्प संचालित स्थानक सुधारणा या प्रकल्पात १९ रेल्वे स्थानकांच्या समावेश आहे. तसेच हा २०१९ मध्ये हा प्रकल्प कोरोनामुळे मागे पडला होता. चार स्थानकांचे प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाल्यानंतर रेल्वे स्थानकांचे रुपडे पूर्णतः बदलेले दिसेल.

Exit mobile version