21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषओपन डेक बसमधून होणारे ‘मुंबई दर्शन’ बंद होणार

ओपन डेक बसमधून होणारे ‘मुंबई दर्शन’ बंद होणार

‘बेस्ट’ उपक्रमाचा निर्णय

Google News Follow

Related

मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू असलेली डबल डेकर बस आता लवकरच हद्दपार केली जाणार आहे. ऑक्टोबरपासून डबल डेकर बस सेवा बंद होणार आहे. ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार ‘बेस्ट’ उपक्रमाचा नसल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या बसचा आनंद घेता येणार नाही.

मुंबई शहरात देशभरातून आणि जगभरातून अनेक पर्यटक येत असतात. मुंबई शहराचे दर्शन घडविणारी ही ओपन डबल डेकर बस ही गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिली आहे. मात्र, पुढील महिन्यापासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून ओपन डेक बसमधून होणारे ‘मुंबई दर्शन’ बंद होणार आहे.

सध्या ‘मुंबई दर्शन’साठी बेस्टच्या तीन बस सेवेत आहेत. मात्र, या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचे आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. ५० नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली निविदा रद्द केल्याने बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे ‘मुंबई दर्शन’ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.

मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना शहरातील पर्यटन स्थळे झटपट पाहता यावी यासाठी २६ जानेवारी १९९७ पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली होती. दर महिन्याला जवळपास २० हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत होते. सध्या बेस्टकडे तीन डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबद्दल केलेले वक्तव्य सुनियोजित’

आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर

ओपन डेक बसमधून घडते ‘या’ ठिकाणांची सफर

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मंत्रालय, विधानभवन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा