ब्रिटनमध्ये सध्या प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई डब्बावाला संघटनेचे ब्रिटन राजघराण्यासोबत काही वेगळचं नातं आहे. आणि याचा अनुभव याआधीही आला आहे. तर सांगायचे म्हणजे प्रिन्स चार्ल्सच्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी डब्बेवाले जोरदार तयारी करत आहेत. या सोहळ्यासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी खास भेटवस्तू खरेदी केल्या आहेत.
लोकल ट्रेन आणि डब्बावाले या दोन मुंबईकरांच्या दोन जीवनवाहिनी मानल्या जातात. .मुंबईचे डब्बेवाले भारतात तर ओळखले जातातच. पण त्यांच्या ड व्यवस्थापनाची यशकथा सातासमुद्रा पार गेली आहे. डबेवाल्यांच्या परदेशात जाऊन आपल्या या व्यवस्थापनाचे धडे दिलेले आहेत. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.
प्रिन्स चार्ल्स जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी मुंबईतील डब्बावाल्यांची आवर्जून भेट घेतली होती. तेव्हापासून मुंबई डब्बावाला असोसिएशनचे ब्रिटीश राजघराण्याशी जवळचे नाते आहे. गेल्या वर्षी जेव्हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले त्यावेळीही सर्व डब्बावाल्यांनी मुंबईत शोकसभा घेतली होती. येत्या ६ मी रोजी प्रिन्स चार्ल्स यांचा राज्याभिषेक होणार आहे. या राज्यभिषेकाचा मुंबईच्या डबेवाल्यांना मोठं आनंद झाला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं
संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!
शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती
राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!
या सर्व डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि वारकरी समाजाची एक खास शाल खरेदी केली आहे. पुणेरी पगडी एक अनोखी शैली आहे. या पागडीला पुण्यात अभिमानाचे आणि सन्मानाचे प्रतीक मानली जाते. पुणेरी पगडीला २००९ मध्ये भौगोलिक संकेताचा दर्जा देण्यात आला होता. आता हीच पगडी भेट म्हणून प्रिन्स चार्ल्स यांना देण्यात येणार आहे.
मुंबईतील डब्बावालांचे राजघराण्याशी जुने नाते आहे. म्हणूनच प्रिन्स चार्ल्स तिसरा यांना राज्याभिषेकासाठी ही अनोखी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. , ब्रिटीश वाणिज्य दूतावासाने त्यांना राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचे निमंत्रणही दिले असल्याचा दावा डब्बावाला संघटनेने केला आहे.