31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषएमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंचे न्यूयॉर्कमध्ये निधन!

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंचे न्यूयॉर्कमध्ये निधन!

क्रिकेट वर्तुळात शोककळा

Google News Follow

Related

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले आहे.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्कमध्ये गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे हे मूळचे नागपूरचे आहेत. अमोल काळेंच्या निधनाने क्रिकेट, राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळाला जबर धक्का बसला आहे.टी-२० वर्ल्डकप २०२४ चा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी अमोल काळे अमेरिकेला गेले होते.त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य

ही तर काँग्रेसची लाचखोरीची गॅरंटी?

राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल !

दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये अमोल काळे यांची एमसीएच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.त्यावेळी अध्यक्षपदासाठी त्यांच्याविरुद्ध विश्वचषक चॅम्पियन संदीप पाटील यांच्यात लढत झाली होती.मात्र, यामध्ये अमोल काळेंची निवड करण्यात आली.एमसीएचे अध्यक्ष बनल्यानंतर अमोल काळेंनी खेळांडूसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.त्यापैकी एक म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ पुरुषांची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय आहे.आगामी मोसमापासून मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, मूळचे नागपूरचे असलेले अमोल काळे हे एक दशकाहून अधिक काळ मुंबईत स्थायिक होते. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सह-प्रवर्तक (Co-Promoter) म्हणून देखील अमोल काळेंनी काम पाहिले आहे.तसेच अमोल काळे यांची ऑगस्ट २०२३ मध्ये आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा