मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा नरीमन पौइंट ते वरळीकडे जाणारा सव्वा सहा किलोमीटरचा बोगदा आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरित तिसरा टप्पा जुलै मध्ये खुला करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आज त्यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मरीन ड्राईव्ह ते हजीअली असा प्रवास करण्यासाठी पूर्वी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत होता मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास केवळ ८ मिनिटात होणार आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. या पूर्वी पहिला टप्पा सुरु करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर होणार पोटनिवडणुका!
गिरीश चंद्र मुर्मू बनू शकतात ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!
पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!
मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न
हा दुसरा टप्पा असून उर्वरित तिसरा टप्पा जुलैमध्ये खुला केला जाईल. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बोगदा करण्यात आला आहे. रहदारीच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.