बाळाचे रडणे थांबवण्यासाठी त्याच्या तोंडाला टेप लावल्याबद्दल पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) रुग्णालयाच्या तीन परिचारिकांवर गुन्हा दाखल केला आहे, असे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.अहवालानुसार बदलापूर येथील गृहिणी प्रिया कांबळे यांनी दावा केला की, २ जून २०२३ रोजी भांडुपमधील बीएमसी रुग्णालयात एनआयसीयूमध्ये (अतिदक्षता विभाग) दाखल असलेल्या तिच्या नवजात मुलाच्या तोंडाला चिकट टेप असल्याचे तिला आढळले.
महिलेने तिच्या आई-वडिलांना आणि माजी नगरसेवकाला याची माहिती दिली त्यांना बोलावून घेतले, त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडे बाळाला डिस्चार्ज देण्याची मागणी केली.काही महिन्यांनंतर, वकील तुषार भोंसले यांनी महाराष्ट्र-रा राज्य मानवी हक्क आयोगाकडे (एमएसएचआरसी) याबाबत तक्रार दाखल केली.त्यानंतर एमएसएचआरसीकडून बीएमसी आणि पोलिसांना समन्स बजावण्यात आले.एमएसएचआरसीच्या प्रकरणाची दखल घेत भांडुप पोलिसांनी गुरुवारी परिचारिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियानच्या वृत्तानुसार, प्रिया युगंधर कांबळे असे तक्रादार महिलेचे नाव आहे. २०२२ मध्ये युगंधर कांबळेसोबत लग्न झालेल्या प्रियाने २० मे २०२३ रोजी भांडुपमधील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला होता.तीन दिवसांनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आणि तिच्या मुलाला काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास परत रुग्णालयात परत येणास सांगितले.
दरम्यान, मुलाचा रंग अचानक पिवळसर झाल्याने प्रियाने २६ मे २०२३ रोजी ताबडतोब रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला सांगितले की, बाळाला जोपर्यंत स्तनपान दिले जात आहे, तोपर्यंत त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.तथापि, बाळाच्या समस्या कमी न झाल्याने , बाळाला ३१ मे २०२३ रोजी एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!
दरम्यान, २ जून २०२३ रोजी रात्री ८ च्या सुमारास, प्रिया तिच्या मुलाला घेण्यासाठी गेली तेव्हा तिला धक्काच बसला.तिने पाहिले की, तिच्या बाळाच्या तोंडाला, त्याच्या मानेला आणि त्याच्या हनुवटी खाली चिकटवलेली होती.तिने ती टेप काढली, टेपमुळे तिच्या मुलाच्या शरीरावर पुरळ उठले होते.त्यानंतर तिने टेपबद्दल चौकशी केली तेव्हा तेथील परिचारिका स्वेता यांनी सांगितले की, बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जाते.
यानंतर एनआयसीयू युनिटमध्ये कार्यरत असलेल्या सविता भोईर यांच्याशी प्रियाने संपर्क साधला.यावर सविता भोईर म्हणाल्या की, एवढा टेपवरून गोंधळ करण्याची गरज नाही. त्यानंतर बाळाला अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी आता भांडुप पोलिसांनी परिचारिकांवर गुन्हा दाखल केला आहे.