बीएमडब्लूच्या बॉनेटवर एका व्यक्तीला बसवून १७ वर्षांचा मुलगा गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कल्याण पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या मुलाचे नाव शुभम मटालिया असे असून तो बीएमडब्लूच्या बॉनेटवर बसल्याचे दिसून येत आहे, तर अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवत आहे. ही घटना कल्याणमधील वर्दळीच्या शिवाजी चौक परिसरात घडली आहे.
हे ही वाचा:
इस्रायलचे नेत्यानाहू म्हणतात, क्षेपणास्त्र डागली, चूक झाली!
एनआयएची मोठी कारवाई; परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी उध्वस्त
यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पाऊस
ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती
बॉनेटवर बसलेल्या व्यक्तीचे नाव मटालिया आहे. मटालिया हा बिनधास्तपणे चालत्या गाडीच्या बॉनेटवर बसल्याचा व्हिडीओ तेथून चालणाऱ्या पादचाऱ्यांनी काढला आहे. ही बीएमडब्लू अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या नावे नोंद आहे. या प्रकरणी मटालिया (२१) आणि गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील अशा दोघांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे कल्याण पोलिसांनी सांगितले.