23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषचला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

Google News Follow

Related

‘जन हो… तुमची हवी आहे साथ, चला देऊ आपल्या कोकणाला मदतीचा हात… येवा, आपल्या कोकणाक देवया मदतीचो हात,’ अशी हाक देत मुंबई भाजपाने चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणासाठी धावून जाण्यासाठी कंबर कसली आहे.

नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला. कोकणी माणसाचे कंबरडे या चक्रीवादळामुळे मोडले. घरे उद्ध्वस्त झाली, फळबागा आडव्या झाल्या, नारळी, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले, कोकणच्या अद्भूत निसर्गाचीही अफाट हानी झाली. फळांचा राजा म्हणविल्या जाणाऱ्या आंब्याचा सारा व्यापार मातीमोल झाला. हजारे हेक्टरवरील आंबा-काजूच्या बागांना मोठा फटका बसला. अशा या साऱ्या परिस्थितीत कोकणच्या माणसाला आधार देण्यासाठी मुंबई भाजपाने मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हे ही वाचा:
लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का?

देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता

कौटुंबिक वादातून महिलेने रेतीबंदर खाडीत मारली उडी

पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ वादळाची पूर्वतयारी

कोट्यवधींचे नुकसान कोकणाला सहन करावे लागले आहे. मात्र या परिस्थितीत कोकणी माणसाला खचू द्यायचे नाही, असा निश्चय मुंबई भाजपाने केला आहे. बाकी कुणी कोकणासाठी पुढे येईल अथवा न येईल याची अजिबात फिकीर न करता आम्ही कोकणासाठी पुढे येणार, भक्कम आधार देणार अशी मुंबई भाजपाची भूमिका आहे.

कोकण पुन्हा उभे करण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. मुंबई भाजपासह भाजपा कोकण विकास आघाडीनेही कोकणाला आधार देण्यासाठी आवाहन केले आहे. वादळातून सावरेल, कोकण सहाय्यता करू आपण अशी घोषणा करत जनसामान्यांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तांदूळ, तुरडाळ, साखर, चहापावडर, ताडपत्री, सीमेंट पत्रे, सोलार बल्ब अशा विविध वस्तूंप्रमाणे ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदतही करण्याचे आर्जव करण्यात आले आहे.

त्यासाठी यथाशक्ती ही आर्थिक मदत पुढील पत्त्यावर जमा करता येईल.

Bank of India,

A/C no. 003520110001109,

Branch Naigaon cross road, Dadar (E),

Mumbai 14

IFSC : BKID0000035

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा