25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषताज हॉटेल बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या, तपासणीत धक्कादायक माहिती उघड!

ताज हॉटेल बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या, तपासणीत धक्कादायक माहिती उघड!

पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु

Google News Follow

Related

मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन चार चाकी गाड्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होताच तपास सुरु केला. पोलिसांच्या चौकशीमध्ये भलतेच कारण समोर आले आहे. पोलिसांनी दोनही जप्त करून कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

प्रकरण असे आहे की, शागीर अली यांनी ताज हॉटेल बाहेरच्या परिसरातून एक कार पकडली, ज्या कारचा नंबर त्यांच्या कारशी मिळता-जुळता होता. शागीर अली यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच नकली नंबर प्लेटच्या संदर्भात आरटीओ कडे तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना खोटे चालान त्यांना भरावे लागत होते.  सुदैवाने आज ( ६ जानेवारी) बनावट नंबर प्लेट असलेली गाडी त्यांना सापडली. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत या सगळ्या संदर्भाची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी या दोनही गाड्या कुलाबा पोलिस स्थानकात आणल्या आणि चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये या प्रकरणातील खरा आरोपी सापडला. आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चालकाने सांगितले की, कारचे हफ्ते थकले होते. कार जप्त होईल या भीतीने कारच्या नंबरमध्ये बदल केला. यातील मूळ वाहन क्रमांक MH०१EE२३८८  या प्रकरणातील आरोपी चालकाचा कार क्रमांक MH०१EE२३८३ असा आहे. आरोपीने शेवटी ३ चे ८ मध्ये रूपांतर केले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका ‘विनोदासाठी’

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले

केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे ३३ कोटींचा खर्च, २९ लाखांचा फक्त टीव्ही!

पन्नूला आली धमकी देण्याची पुन्हा खुमखुमी, महाकुंभला दिला इशारा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा