तहव्वुर राणाला कसाब सारखी बिर्याणी देण्याची गरज नाही, फाशी द्या!

२६/११ चा नायक 'छोटू चायवाला' उर्फ ​​मोहम्मद तौफिक यांची मागणी 

तहव्वुर राणाला कसाब सारखी बिर्याणी देण्याची गरज नाही, फाशी द्या!

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जात आहे. भारतातील तपास संस्थांचे एक पथक अमेरिकेत पोहोचून आणि सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्याला परत आणत आहे. दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणले जात असताना राजकीय नेत्यांसह सामान्य लोकांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच दरम्यान, २६/११ चा नायक म्हणून ओळखले जाणारे ‘छोटू चायवाला’ उर्फ ​​मोहम्मद तौफिक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तहव्वुर राणाला कसाब सारखी बिर्याणी देण्याची गरज नसून फाशी देण्याची मागणी ​​मोहम्मद तौफिक यांनी केली आहे.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान मोहम्मद तौफिक हे प्रत्यक्षदर्शी होते आणि यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत  एएनआयशी बोलताना ते म्हणाले,  भारताने तहव्वुर राणाला विशेष सेल, अजमल कसाबसारखी बिर्याणी अशा प्रकारच्या सेवा देण्याची गरज नाही.

अशा दहशतवाद्यांसाठी एक वेगळा कायदा बनला पाहिजे. अशा लोकांना दोन-तीन महिन्यात फाशी दिली गेली पाहिजे, नाहीतर रस्त्यांवर गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांना भारतात घेवून या, बिर्याणी खाऊ घाला, यासाठीचा संपूर्ण पैसा वाया आहे. भारतात येवून तो काही आमच्यावर उपकार करत नाही. २६/११ च्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.

हे ही वाचा : 

तहव्वुर राणाला भारतात आणणे हे मोदी सरकारचे मोठे यश!

जेएनयूमध्ये पुन्हा शांभवी थिटेने डाव्यांना आवाज दिला; महाराणा प्रताप यांचा अपमान

राजनाथ सिंह यांनी शहीद सैनिकांना वाहिली श्रद्धांजली

भारत आणि यूकेमध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंटसाठी चर्चा सुरू

घटनेवेळी मी समोरून पाहिले आहे, हल्ल्यात कोणाची आई, वडील, भाऊ-बहिण गेली. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींना माजी विनंती आहे कि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, मी तर म्हणतो १५ दिवसात त्याला फाशी दिली तर खूप चांगली गोष्ट आहे. जर रस्त्यावर फाशी दिली तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या मनातही भीती निर्माण होईल. अशा लोकांना जास्त दिवस ठेवून काही उपयोग नाही, कडक कारवाई झाली पाहिजे, असे मोहम्मद तौफिक म्हणाले.

मग तुम्ही आमदार असून उपयोग काय ? | Mahesh Vichare | Amit Gorkhe | Devendra Fadnavis | Eknath Shinde

Exit mobile version