मुंबईत, महाराष्ट्रात नोंदवली गेली आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

मुंबईत, महाराष्ट्रात नोंदवली गेली आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला असून गुरुवारी राज्यात आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात ३५,९५२ नवे कोरोना रुग्ण नोंदवले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनची एका दिवसात नोंदवली गेलेली ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य आहे. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थिती बाबत केंद्र सरकारतर्फेही वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

गुरुवारी महाराष्ट्रासोबतच राजधानी मुंबईतही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. मुंबईत गुरुवारी ५,५०४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर मुंबईत गेल्या २४ तासांत चौदा मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण आणि रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत केंद्र सरकारतर्फेही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात कोविड रुग्णांची जी वाढ होत आहे त्यात महाराष्ट्र राज्य क्रमांक पहिला आहे. महाराष्ट्रात रोज कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक होताना दिसत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे जिल्हा क्रमांक एक ला आहे. पुणे व्यतिरिक्त नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांव्यतिरिक्त कर्नाटकातील बंगलोर अर्बन जिल्ह्याचा सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

बुधवारी महाराष्ट्रात बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रात्री १२ वाजल्यापासून हा लॉकडाऊन लावला जाणार आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यांत लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. तर परभणीत आठवडाभराचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

Exit mobile version