छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वाधिक व्यस्त असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागच्या आठवड्यात २४ तासाच्या कालावधीमध्ये कोरोनामध्ये सर्वाधिक प्रवास करून नवा विक्रम तयार केला आहे. तसेच कोरोना संकट नियंत्रणात येताच प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच मुंबई विमानतळावर एकाच दिवशी तब्बल १ लाख ३० हजार ३३४ प्रवाशांची ने-आण केली आहे. अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७ ते १८ सप्टेंबर रोजी तब्बल २ लाख ६० हजार नागरीकांनी विमानातून प्रवास केला आहे. तसेच मार्च २०२० अर्थात कोरोना काळ संकटानंतर सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. आता कोरोना काळ संपून सर्वाधिक क्षेत्र पूर्ण क्षमतेने चालू झाले असून, हवाई क्षेत्रही पूर्ण क्षमतेने चालू झाली आहेत. १७ सप्टेंबर रोजी सुमारे ९५,०८० आंतरराष्ट्रीय, ३५, २९४ देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला असून एकूण ८४९ विमानांची या विमानतळावरून उड्डाणे केली. असल्याची माहित समोर आली आहे. तसेच यात मोठ्या प्रमाणावर अबुधाबी, दुबई आणि सिंगापूर येथून सर्वाधिक प्रवाशांनी मुंबई विमानतळावर आगमन – प्रस्थान केल आहे. तसेच रविवारी देखील ९८ हजार देशांतगर्त तर ३२ हजार प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे.
हे ही वाचा:
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
मुंबईचे विमानतळ हे सर्वाधिक व्यस्थ विमानतळ म्हणून ओळखले जाते. तसेच त्यावेळी दररोज सरासरी ९०० हून अधिक विमानांची ये-जा होत असे, मात्र डिसेंबर २०१८ ला एकाच दिवशी २४ तासाच्या कलावधी मध्ये १००८ व ताशी ५४ विमानांची ये-जा विमानतळाने हाताळणी होती. आता पुन्हा त्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे असे चित्र दिसत आहे.