छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद बंदर स्थानकादरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल रविवारी पाडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीपासून २७ तासांचा मेगाब्लॉक लागू केला आहे.मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक रात्री ११ वाजता (१९ नोव्हेंबर रोजी) सुरू होईल आणि २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संपेल असे म्हटले आहे. यामुळे उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे .
या मेगाब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या ३७ लाखांहून प्रवासी तसेच बाहेरच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर परिणाम होऊ शकतो. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर १,८०० पेक्षा जास्त लोकल सेवा चालवल्या जातात.
रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा पूल १८६६-६७ मध्ये बांधण्यात आला होता आणि २०१८ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे च्या तज्ज्ञ पथकाने त्याला असुरक्षित घोषित केले होते. २०१४ मध्येच या पुलावर अवजड वाहनांची वाहतूक थांबवली होती.
हे ही वाचा :
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले
या पुलाचा लोखंडी पुलाचा मोठा भाग आधीच पाडण्यात आला आहे. त्यामुळे, ब्लॉक दरम्यान फक्त रेल्वे ओव्हर ब्रिजचे स्टील स्ट्रक्चर कापले जाईल आणि रोड क्रेनच्या सहाय्याने काढले जाईल. शुक्रवारी सीआर महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाडकामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.