मुंबई उपनगरात प्रसिध्द अशा लालबहादुर शास्त्री मार्गावर बांग्लादेश मधील आदिवासी, दलित, बौद्ध हिंदू समाजावर होणारा अत्याचार त्वरित थांबावा व त्यांच्या मानवाधिकाराचे संरक्षण व्हावे ह्या मागणीसाठी मानवसाखळी अभियान राबवण्यात आले. यावेळी मुलुंड चेक नाका ते विक्रोळी रेल्वे स्टेशन पर्यंत मानवसाखळी करण्यात आली होती. बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱ्या अमानवीय हिंसाचाराच्या विरोधात हिंदू समजाने लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले होते, यावेळी, महिला, वृद्ध, बाल, तरुण अश्या समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी सहभाग दर्शवला. हिंदूंच्या जीविताच्या, भाषणाच्या, अभिव्यक्तीच्या, समानतेच्या अधिकारांची होणारी गळचेपी आणि आत्मरक्षणाच्या अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या युनूस सरकारचा निषेध करत त्यांनी घोषणाबाजी केली.
ऑगस्ट महिन्यात बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचा तख्तापालट केल्यानंतर अराजकांनी मोर्चा हिंदू समाजाकडे वळवला, जगभरातल्या इस्लामी कट्टरपंथीयांप्रमाणेच बांगलादेशातल्या कट्टरपंथीयांसाठी हिंदू (मूर्तिपूजक/मुश्रीक) हेच शत्रू आहेत. ‘शत्रूला संपवण्यासाठी संघर्ष (जिहाद) करणं हे इस्लामच्या अनुयायांचे प्रमुख कर्तव्य आहे. जो तसं करत नाही त्याला दांभिक (मुनाफिक) समजण्यात येते, आणि असा मुसलमानही शिक्षेस पात्र असतो.
या पराकोटीच्या कट्टर मानसिकतेतून बांग्लादेशातल्या जमियत-उलेमा-ए-हिंद सारख्या संघटना हिंदू समाजाला लक्ष्य करत आहेत. रात्रीतल्या रात्रीत हिंदू समाजाच्या वस्त्या जाळल्या जात आहेत. हत्या, जाळपोळ, दंगली, जेलबंदी, मॉब लिंचिंग, हिंदू मुलीचे अपहरण, बलात्कार अश्या मानवाधिकाराला काळीमा फासणाऱ्या घटनांनी शिखर गाठलंय. शेख हसिनांच्या भारतात शरण घेतल्यानंतर डिपस्टेटचा टेकू देऊन बनवण्यात आलेले, नोबेल लॉरिएट मुहम्मद युनूस यांच्या सरकार ने हिंदू आणि मुस्लिमेत्तरांच्या रक्षाकाची भूमिका घेण्याऐवजी हल्लेखोरांवर कारवाया न करून प्रोत्साहनच दिलं आहे.
मात्र हिंदू समजाचे संत चिन्मय कृष्ण दास प्रभू आणि सहकाऱ्यांनी हिंदूंना संगठीत करुन दाद मागितल्यावर राजद्रोहाचे खटले चढविण्यात आले आहेत.‘ऑल आईज ऑन राफा’ म्हणत इज्राइल युद्धात डोळे वटारून बघणाऱ्या हिंदू सेलिब्रिटींना बांग्लादेशकडे नजर फिरवतानाही बुबुळांत आकडी येते.
हे ही वाचा :
हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!
नक्षलवाद्यांचा कमांडरच सांगतो आहे की, लोकांना बंदूक नको, विकास हवा!
मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात
सैफ अली खान म्हणाला, मोदी थकले असतील असे वाटले, पण चेहऱ्यावर तेज होते!
शेवटी हिंदूंनाच त्यांचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल असे संकेत नियती वारंवार देते, हिंदू मात्र नकली आस्था आणि स्वार्थी मानसिकतेने एकटा पडतो आहे. हिंदूंचे रक्षण करावयासाठी हिंदू हिताचे सरकार आणून दिल्याने कर्तव्य संपत नाही. न्याय मागण्यासाठी हिंदू समाजासोबत रस्त्यावर उतरावे लागते. भारताचा बहुसंख्य समाज हा हिंदू आहे, तो स्वभावानेच उदार समाज असल्याने आज आपण संविधानाची पंच्याहत्तरी केली, जेंव्हा कि बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्या संविधानाला वारंवार केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
उद्या हा हिंदू समाज अल्पसंख्येत जाईल तेंव्हा आज बांग्लादेशात जे अराजक माजले आहे तसे भारतात माजेल हा अंदाज नसून सत्य आहे. त्यामुळे हिंदू हिताच्या रक्षणाची जवाबदारी ही प्रत्येक हिंदूची जवाबदारी आहे. हेच समाजाला सांगण्यासाठी, बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारावर दाद मागण्यासाठी, बहुसंख्य हिंदू समाजाला गदागदा हलवून जागवण्यासाठी रविवार (१५ डिसेंबर) लाल बहादूर शास्त्री मार्ग मुलुंड चेकनाका ते विक्रोळी पश्चिम मानवसाखळी करण्यात आली होती.यावेळी फक्त मुंबई नाही तर जगभरातला हिंदू समाज बांग्लादेशात आपल्या बंधूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उभा आहे असे सांगण्यात आलं.