मुख्तार गँगचा शूटर अनुज कन्नौजिया एन्काऊंटरमध्ये ठार

मुख्तार गँगचा शूटर अनुज कन्नौजिया एन्काऊंटरमध्ये ठार

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुख्तार अंसारी गँगच्या ढाई लाख रुपयांच्या इनामी शूटर अनुज कन्नौजियाला एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका संयुक्त ऑपरेशनदरम्यान त्याचा खात्मा करण्यात आला. अनुज कन्नौजियावर २.५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते आणि तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांना हवा होता. मिळालेल्या माहितीनुसार, यूपी एसटीएफ आणि झारखंड पोलिसांना अनुज कन्नौजियाच्या जमशेदपूरमध्ये असण्याची माहिती मिळाली. त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी कारवाई केली, पण त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याला ठार केले. मात्र, या चकमकीत एसटीएफचे पोलिस उपाधीक्षक (डीएसपी) डीके शाही जखमी झाले.

पोलिसांच्या मते, तो मुख्तार अंसारी गँगसाठी शूटर भरती आणि हत्यांची कटकारस्थानं रचण्याचे काम करत होता. एन्काऊंटरच्या ठिकाणी पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि इतर आक्षेपार्ह सामग्री जप्त केली आहे. उत्तर प्रदेश एसटीएफचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) अमिताभ यश यांनी सांगितले, “एसटीएफ आणि झारखंड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अनुज कन्नौजियाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सुरक्षा दलांवर गोळीबार केला. झालेल्या चकमकीत तो ठार झाला.”

हेही वाचा..

बीडमधील मशिदीत स्फोट !

पंतप्रधानांकडून आद्य सरसंघचालकांना आदरांजली!

महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन

ऑपरेशन ब्रह्मा: भारतीय नौदलाची जहाजे ४० टन मदत साहित्य घेऊन म्यानमारकडे रवाना

अनुज कन्नौजिया गेल्या पाच वर्षांपासून फरार होता आणि हत्या, खंडणी, जमीन बळकावणे आणि शस्त्रास्त्र तस्करी यांसारख्या २३ गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड होता. उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी अलीकडेच अनुज कन्नौजियासंबंधी माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम १ लाखांवरून २.५ लाख रुपये केली होती. उत्तर प्रदेश एसटीएफच्या एडीजींनी सांगितले, “जमशेदपूरमध्ये अनुज कन्नौजियाच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जवळपास २० फायर केले आणि पळून जाण्यासाठी एक बॉम्बही फेकला. त्यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. चकमकीदरम्यान डीएसपी डीके शाही यांच्या खांद्याला गोळी लागली, पण त्यांनी ऑपरेशनचं नेतृत्व सुरूच ठेवलं. अखेर, अनुज कन्नौजिया अनेक गोळ्या लागल्याने जागीच कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.”

Exit mobile version