मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा दिला राजीनामा   

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा दिला राजीनामा   

ब्लूमबर्गच्या यादीप्रमाणे त्यांची एकूण संपत्ती ७६.५ अब्ज डॉलर झाल्यमुळे ते अकरावे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

आशियातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार, २८ जून रोजी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिलायन्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली. २७ जूनला मुकेश अंबानी यांनी तात्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.

हे ही वाचा:

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

रिलायन्स संचालक मंडळाने आकाश अंबानी यांच्याशिवाय इतरही काही नियुक्तीचे निर्णय घेतले आहेत. यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे. रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Exit mobile version