भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून परिचित असलेले रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देण्याबाबतही एक वेगळी ओळख आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला सुह्द धक्का दिला आहे. अंबानी यांनी या कर्मचाऱ्याला मुंबईत तब्बल १,५०० कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे.
मुकेश मोदी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुकेश मोदी हे रिलायन्समध्ये कर्मचारी तर आहेतच पण ते अंबानी यांचे महाविद्यालयापासूनचे मित्र देखील आहेत. अंबानी आणि मोदी हे दोघेही मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागातील त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते मित्र आहेत.
मोदी हे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस रिलायन्समध्ये रुजू झाले. त्यावेळी कंपनीचे नेतृत्व धीरूभाई अंबानी करत होते. रिलायन्सने केलेल्या काही अब्ज डॉलरच्या व्यवहारामध्ये मोदी यांचे डॉलरच्या व्यवहारांमध्ये मोदी यांचे नेहमीच मोलाचे योगदान होते. मोदी यांच्याकडे कंपनीमध्ये काही विशिष्ट असे पद नाही.
पण सारे जग कोरोनाव्हायरसशी लढत असताना, एप्रिल २०२० मध्ये रिलायन्स जिओच्या फेसबुकसोबत झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या करारामध्ये मोदी यांचे सर्वात महत्वाचे योगदान होते. आकाश अंबानी हे या करारामागील प्रमुख व्यक्ती असले तरी मोदींनीही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली. फक्त याच व्यवहारामध्ये नाही तर मोदी हे आकाश अंबानीसोबत रिलायन्सचे सर्व मोठे सौदे तडीला नेण्याचे काम ते करत आहेत.
मुकेश अंबानी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मनोज मोदी ओळखले जातात. अत्यंत नम्र आणि साधी व्यक्ती असलेले मोदी हे सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओमध्ये संचालक म्हणून काम करत आहे. मुकेश आणि नीता अंबानींसोबत इतकी वर्षे काम केल्यानंतर मोदी आता आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत काम करत आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’
छोट्या शाल्मलीने वाजविलेला पियानो पंतप्रधान मोदींनाही भलताच आवडला!
जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात
२२ मजली इमारतीत घर
मोदी याना भेट देण्यात आलेले घर हे २२ मजली इमारतीत असून १. ७ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे. या जागेची किंमत १,५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहेत. इमारतीचे पहिले सात मजले कार पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मुकेश अंबानी यांनी भेट दिलेल्या घराची रचना तलाटी अँड पार्टनर्स एलएलपीने केली आहे.