अंबानी कुटुंबात एक मोठी बातमी आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाने शनिवारी एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव आडिया तर बाळाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर दोघेही आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.
ईशाने १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला असल्याचे अंबानी कुटुंबीयांनी म्हटले आहे. ‘आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांना १९ नोव्हेंबर २०२२ रोजी देवाने जुळी मुले दिली आहेत. ईशा आणि आडिया आणि कृष्णाची दोन्ही बाळं चांगली आहेत. आदिया, कृष्णा, ईशा आणि आनंद यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो असे अंबानी कुटुंबाने म्हटले आहे.
मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आता तीन लहान मुले आहेत. त्यांचा मुलगा आकाश आणि श्लोका यांना पृथ्वी नावाचा मुलगा आहे. मुकेश आणि नीता अंबानी अनेक वेळा त्यांचा नातू पृथ्वीसोबत दिसले आहेत.मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी ईशा अंबानी सर्वात मोठी आहे. तिने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.
हे ही वाचा :
सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
ईशा अंबानीचे लग्न २०१८ मध्ये पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत झाले होते. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज च्या रिटेल व्यवसायाची कमान ईशा अंबानीकडे सोपवली. २०१४ मध्ये, ईशा अंबानीचा रिलायन्स रिटेल आणि जिओच्या बोर्ड मेंबरमध्ये समावेश करण्यात आला होता.
आनंद पिरामल हे पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचे पुत्र आहेत. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर घेतली आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केले आहे. सध्या ते पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. आनंद पिरामल यांची आई स्वाती पिरामल या मुंबईतील प्रसिद्ध गोपीकृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या त्या संस्थापक आहेत.