गेल्या दोन दिवसांत मुंबई व आसपासच्या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जी भयावह परिस्थिती निर्माण झाली, त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भांडुप येथील पंपिंग स्टेशनमध्येच हे चिखलमिश्रित पाणी शिरले आणि मुंबई महानगरपालिकेचे सगळे सुव्यवस्थेचे दावे बुडून गेले. या पंपिंग स्टेशनच्या कक्षेत येणाऱ्या विभागात आणि एकूणच मुंबईत विविध ठिकाणी पिण्याचे गढूळ पाणी येऊ लागले आहे. हे पाणी लोक उकळून पित आहेत, पण त्या पाण्याचा रंग मातकट असल्यामुळे ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. तरीही नाईलाजाने लोकांना पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करावा लागतो आहे. हेच गढुळलेले पाणी कपडे, भांडी धुण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे लोकांपुढे नवी चिंता निर्माण झाली आहे. या सगळ्यावर तूर्तास कोणताही उपाय पालिकेकडून सांगण्यात आलेला नाही. हे किती दिवस चालणार याचीही कोणती कल्पना देण्यात आलेली नाही. परिणामी, लोकांना आता याच पाण्याचा वापर करण्यावाचून पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
हे ही वाचा:
जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ
पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कायम
‘आमचे उद्धव काका’ या विषयावर आता निबंध!
विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना ५० हजार रुपये द्या
वरळी आणि आजूबाजूच्या भागात सध्या अशा गढूळ पाण्यामुळे लोक त्रासले आहेत. या पाण्यामुळे कोणते रोग निर्माण होतील का, दूषित पाणी प्यायल्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळात आणखी नव्या रोगांची भर पडेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.