राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचे दररोज ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांना मुंबई लोकलबाबत प्रश्न विचारला असता, मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार सध्या नागपुरात आहेत. नागपुरातील रुग्णवाढ चिंतेची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. २५ वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकंच नाही तर लहानग्यांनाही कोरोना होत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. रुग्णवाढ होत असताना थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री लाईव्ह, लॉकडाऊनची घोषणा करणार?
वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा
भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही
मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. माझं आवाहन आहे, रक्तदान करा, ते श्रेष्ठदान आहे, नागपूरकरांनी नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करा, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.