मानकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन (एमएस स्वामीनाथन), प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारताच्या ‘हरितक्रांतीचे’ जनक यांचे गुरुवारी चेन्नई येथे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे.भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन मिळू शकेल याउद्देशाने स्वामीनाथन यांनी धानाच्या उच्च उत्पन्न देणार्या जाती विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
स्वामीनाथन यांचे गुरुवारी सकाळी ११.२० च्या सुमारास त्यांचे चेन्नईतील तेनमपेट येथे राहत्या घरी निधन झाले, ते ९८ वर्षांचे होते.स्वामीनाथन हे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक होते.
७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्वामीनाथन यांचा जन्मलेले ते एक कृषी शास्त्रज्ञ, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ, प्रशासक आणि मानवतावादी होते. भारतात उच्च उत्पादन देणार्या भाताच्या जाती विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.त्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकले.
हे ही वाचा:
जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?
फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!
१९६० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना त्यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. त्यांनी डॉ. बोरलॉग यांना भारतात आंमत्रित केलं. त्यांच्यासोबत काम करता-करता स्वामीनाथन यांनी भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचं उत्पादन घेतलं. तसंच, कोणती खतं वापरून अधिक उत्पादन घेता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि गव्हाचं उत्पादन चार हंगामात १.२ कोटी टनावरून २.३ कोटी टन इतकं झाले होते.