महेंद्रसिंग धोनीने सोडले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद

महेंद्रसिंग धोनीने सोडले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय दोन्ही घेतला आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे क्रिकेट रसिकांना चांगलाच धक्का बसला आहे. महेंद्रसिंग धोनीचा वारसा पुढे नेण्यासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली आहे. जडेजा आता चेन्नई सुपर किंग्सच्या यल्लो आर्मीचा कर्णधार असेल.

महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्स संघासोबत जोडलेला आहे. स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून तो या संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करत होता. २००८ साली आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू झाल्यापासूनच धोनी चेन्नई संघाला पुढे घेऊन जात आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले आहे. तर तब्बल नऊ वेळा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. धोनीच्या नेतृत्वात संघाने २०१० आणि २०१४ साली चॅंपियन्स लीग टी २० स्पर्धेचा चषकही पटकावला आहे.

हे ही वाचा:

‘परीक्षेचा हिजाब वादाशी संबंध नाही’, तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम

विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर

आज लोकसभेत काही मोठे होणार?

२००८ ते २०२१ यापैकी दोन वर्ष चेन्नई संघावर बंदी होती पण तो अपवाद वगळता उरलेल्या बारा हंगामांमध्ये धोनी हा चेन्नई संघ सोबतच खेळला असून त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर लीलया पेलली होती. यंदाच्या टाटा आयपीएल मध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात चेन्नई संघ मैदानात उतरेल. पण असे असले तरीही महेंद्रसिंग धोनीची जबाबदारी इथे संपत नाही. रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून मार्गदर्शन करण्यात त्याचा मोठा वाटा असणार आहे.

Exit mobile version